वटपौर्णिमेला सौभाग्यवतीला भावपूर्ण श्रद्धांजली!

|| हरि ॐ ||

वटपौर्णिमेला सौभाग्यवतीला भावपूर्ण श्रद्धांजली!

५ जून पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी सौ. अनिता नरे हिची प्राणज्योत मावळली! श्री. अनिल नरे यांनी लगेचच अतीव दुःखद बातमी फोनवर दिली. खूप दुःख झालं, धक्का बसला!

प्रेमळ वहिनींनी या जगाचा निरोप घेतला; पण त्यांनी आपल्या कुटुंबियांना, ओळखीच्यांना खूप प्रेम दिलं. संसाराच्या चढ-उतारात ती सर्वांशी प्रेमळपणे वागायची.  तिचं हे काही जाण्याचं वय नव्हतं; पण 'नियतीसमोर कोणाचेही चालत नाही' म्हणतात तेच खरं! तिच्या जाण्याने पती विनय नरे, दोन मुली, मुलगा, जावई, आई, भाऊ, सासू-सासरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अचानक आलेल्या प्रसंगातून त्यांना सावरण्याचे सामर्थ्य परमात्मा त्यांना देवो हीच प्रार्थना!!! 

श्री. विनय नरे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर! अगदी कष्टप्रद मेहनत करून त्यांनी मुंबईमध्ये स्वतःची फर्म उभी केली. यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले.  स्वतःचा व्यवसाय सांभाळत असताना अनेकांना वेगवेगळ्या कंपन्यांमधून किंवा स्वतःकडे नोकरीला ठेवणे, गरजूंना आर्थिक मदत करणे, कोणाच्याही मदतीला धावून जाणे... अशाप्रकारे वैयक्तिक पातळीवर कार्य करीत असताना समाजसेवेतही ते नेहमी अग्रेसर राहिले. ते शुभंकर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. मागील चार वर्षे असलदे- नांदगाव पंचक्रोशीत मोफत आरोग्य शिबिर, मोफत चष्मा वाटप, औषध वाटप, दरवर्षी शेकडो मुलांना वह्यावाटप, रुग्णांना आर्थिक मदत... अशा प्रकारे उल्लेखनीय कार्य त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून उभी केली आहेत. पंचक्रोशीत सार्वजनिक कामांनाही त्यांनी अनेकवेळा प्रचंड आर्थिक मदत केली आहे. कांजूरमार्ग येथे एका क्रीडा मंडळाची स्थापना करून अनेक कबड्डी व क्रिकेट खेळाडूंना लागणारे क्रीडा साहित्य अनेक वर्षे पुरवितात. कुठल्याही चांगल्या कामाला सहकार्य करण्याचे त्यांचे धोरण असते. अशाप्रकारे यांच्याकडून आजपर्यंत सुंदर समाजकार्य घडले; कारण विनय नरे यांची पत्नी सौ. अनिता हिने त्यांना यथोचित साथ दिली. विनय नरे यांच्या मागे ठामपणे ती माऊली उभी राहिली. त्या माऊलीच्या साथीने विनय यांनी केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. त्या माऊलीला जाऊन आज बारा दिवस झाले.

पाच जून रोजी ब्रह्ममुहूर्तावर तिने जगाचा निरोप घेतला. आज सौभाग्यवतींसाठी महत्त्वाचा दिवस; वटपौर्णिमा! आणि आजच्या दिवशी बारावा दिवस!! खरं सौभाग्य जीवन आयुष्यात येण्याची हीच ती खूण! देवावर पूर्ण श्रद्धा असलेली माऊली सौ. अनिता परमात्म्याच्या चरणी एकरूप झाली!!!

शुभमंगल ट्रस्ट, असलदे विकास मंडळ, श्री माऊली देवी विकास मंडळ मधलीवाडी असलदे, क्षा. म. समाज संघटन आणि पाक्षिक 'स्टार वृत्त' यांच्यातर्फे स्वर्गीय सौ. अनिता नरे  यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! 

पर्वता एवढ्या दुःखातून विनय नरे यांच्या कुटुंबियांना बाहेर पडण्याचे सामर्थ्य परमात्मा देवो हीच प्रार्थना!!!

-नरेंद्र हडकर

Comments