https://kmsamaj.org/sanjay-namdev-lokes-appointment-to-the-post-of-ass-sub-inspector-of-police/
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
सन्माननिय श्री. संजय नामदेव लोके (असलदे मधलीवाडी) यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर (कांजुरमार्ग पोलीस स्टेशन मुंबई) बढती झाली आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
संजय लोके यांचे वडील नामदेव लोके मुंबई पोलीस दलात सेवा करून निवृत्त झाले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे मोठे बंधू राजेंद्र हेसुद्धा मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत.
संजय लोके १५ सप्टेंबर १९८९ रोजी मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून रुजू झाले. गेली बत्तीस वर्षे त्यांनी निष्कलंक सेवा केली असून प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमपणा ह्या गुणांमुळे मुंबई पोलीस दलात त्यांचे नेहमीच कौतुक होत असते. सामाजिक जाण असणारे संजय लोके हे नेहमी वाडीतील-गावातील सामाजिक उपक्रमात तसेच धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असतात. कोरोना महामारीच्या काळामध्ये मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात त्यांनी जीवावर उदार होऊन केलेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे! अतिशय प्रेमळ स्वभाव असणारे संजय लोके यांचा मित्र परिवार ही खूप मोठा! त्यांनी दोस्ती केली, वाढवली आणि जोपासली सुद्धा! असा आमचा परममित्र संजय याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! त्याला त्याच्या जीवनात सुख, समाधान, आनंद, सुयश, निरोगी दीर्घायुष्य लाभो; हीच श्रीमाऊली देवीकडे प्रार्थना!
गावातील व्यक्ती अशा मोठ्या पदांवर कार्य करतात तेव्हा खूप अभिमान वाटतो! संजय लोके यांच्याकडून मुंबई पोलिस दलात अभिमानास्पद कार्य घडो; ही सदिच्छा!
-नरेंद्र हडकर
Comments
Post a Comment