खोट्यांचा नाश करण्यासाठी...


सुपातला जात्यात भरडणाऱ्याची मजा बघतो; परंतु सुपातलाही नंतर जात्यात भरडला जाणार असतो. जात्यात भरडण्यापुर्वीच स्वत:चं सामर्थ्य दाखविल्याशिवाय पर्याय नसतो; हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत मुठभर विकृत ल़ोक चांगल्या लोकांवर अन्याय करून छळत राहाणार!

मुठभर वाईट माणसं नेहमीच स्वस्वार्थापोठी एकत्र राहतात. पण चांगली माणसं त्यांचा कोणताही स्वस्वार्थ नसल्याने संघटीत होत नाहीत. त्याचाच फायदा वाईट माणसं अगदी बरोबर उचलतात आणि चांगल्या लोकांवर अन्याय करतात. चांगल्या माणसांनी मांडलेली उचित भूमिका, मांडलेलं वास्तव-सत्य सुद्धा 'आमचं ठरलं' हे दोन शब्द सांगून फेटाळतात, दुर्लक्षित करतात.

संघटीत वाईट माणसांना कितीही समजावून सांगा; त्याचा काहीच उपयोग नाही.

म्हणूनच चांगल्या माणसांनी सत्य, वास्तववादी हितकारक भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे आणि सत्य, वास्तववादी भूमिकेला साथ दिल्यानंतर वाईट माणसांकडून कमी अधिक त्रास होणार लक्षात ठेऊन तशी मानसिकता तयार केली पाहिजे. तरच खोट्यांचा नाश होईल.

- नरेंद्र हडकर 

Comments